शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शानू पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल


नफिसा गिरकर : ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अश्रफ शानू पठाण यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका निवडणुकीत विजयी होऊन नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन अपमान केल्याचा आरोप भाजपाच्या कौसा मंडळ अध्यक्ष नाझिया तांबोळी यांनी केला आहे.


याप्रकरणी मुंब्रा पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शानू पठाण यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 299 व 302 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अमृत नगर येथील दर्गाह गल्लीमध्ये स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या विजयी मेळाव्यात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा प्रकार घडला होता. याबाबतची चित्रफित मुंब्रा व इतर परिसरात प्रसारित झाली असून मुंब्रा येथील मराठी मुसलमान म्हणून आपली शानू पठाण यांच्या विरोधात तक्रार असल्याचे तांबोळी म्हणाल्या.

सदर चित्रफितीतील भाषणावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा दिसत आहेत, शानू पठाण यांनी कोणतीही नैतिकता न जपता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामुळे मुंब्रातील मराठी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार तांबोळी यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त,राजकीय दबावामुळे त्रास होत असल्याचा नगरसेवकांचा आरोप

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले