विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शानू पठाण यांचा सत्कार


नफीसा  गिरकर- ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी दुसऱ्यांदा निवड झाल्या बद्दल मुंब्रा कौसा येथील प्रभाग क्रमांक 32 चे नगरसेवक अश्रफ शानू पठाण यांचा मुंब्रा कौसामध्ये विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. 



राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली या सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.

मुंब्रा रेल्वे स्थानकापासून शिमला पार्क परिसरापर्यंत विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत पुष्पहार घालून पठाण यांचा सत्कार करण्यात आला. 


सत्काराला उत्तर देताना पठाण यांनी मुंब्रा कौसा येथील नागरिकांच्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले व प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पूर्ण क्षमतेने तत्पर राहण्याची ग्वाही दिली. आमदार जितेंद्र आव्हाड व पक्षाने जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे त्याला पात्र ठरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याची ग्वाही शानू पठाण यांनी दिली. मुंब्रा मध्ये काही ठिकाणी उद्भवलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. 

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक शाकीर शेख, साकीब दाते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नगरसेविका मर्जिया पठाण यांनी मुंब्रा कौसाच्या समग्र विकासासाठी कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला. 

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील जामा मशीदीजवळ,  संजय नगर येथे, शरीफा रोड, गुलाब पार्क मार्केट, शिमला पार्क मुख्य नाका, अलमास कॉलनी नाका,  नशेमन कॉलनी नाका व अमृत नगर दर्गाह या ठिकाणी पठाण यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. 

शमीम खान यांनी शानू पठाण यांच्या पदाच्या माध्यमातून मुंब्रावासियांची विकासकामे करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त,राजकीय दबावामुळे त्रास होत असल्याचा नगरसेवकांचा आरोप

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले