मुंब्रामध्ये शिया समाजाचा इस्राईल व अमेरिका विरोधात भव्य मोर्चा
नफिसा गिरकर : इस्राईल व अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याविरोधात मुंब्रा मधील अमृत नगर जवळील शिया समुदायाच्या मशीदीजवळ या समाजाने भव्य मोर्चा काढला व अमेरिकेचा निषेध केला.
इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांच्या निधनाबद्दल यावेळी शोक व्यक्त करण्यात आला. अमेरिका व इस्राईलच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शिया समुदायामुळे मुंब्रा येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अमेरिकेच्या दमणकारी योजना विरोधात या समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. इराणवरील हल्ला हा केवळ इराण देशावरील हल्ला नसून जगातील संपूर्ण शिया समुदायावरील हल्ला असल्याचे आम्ही मानतो असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. इस्राईल व अमेरिकेच्या विविध वस्तूंवर बहिष्कार घालण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा