मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील डोंगरावरील जंगलामध्ये आग



नफिसा गिरकर :  मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरच्या डोंगरावरील जंगलात मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग डोंगराच्या उंच भागात लागल्याने पाण्याचा मारा करणे शक्य होईल का याबाबत साशंकता आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतची माहिती 
अग्निशमन दल व वनविभागाला देण्यात आली आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही आग लागली की कुणी जाणिवपूर्वक लावली , अशी चर्चा केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रादेवी मंदिरामागे डोंगरावर आग लागली होती.  तेव्हा देखील उंच भागात आग लागल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा करणे अशक्य झाले होते. 


तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी समाजकंटकाने जाणिवपूर्वक लावली याचा तपास होणे आवश्यक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शानू पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त,राजकीय दबावामुळे त्रास होत असल्याचा नगरसेवकांचा आरोप