एमआयएमची इफ्तार पार्टी संपन्न

एमआयएमची इफ्तार पार्टी संपन्न
 मुंब्रा :    एमआयएम पक्षातर्फे मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी देशात शांतता अबाधित राहण्यासाठी व पॅलेस्टाईन पीडितांसाठी प्रार्थना करण्यात आली. 

यावेळी पक्षाचे प्रवक्ते माजी आमदार वारीस पठाण,  मुंबई अध्यक्ष फय्याज  खान,  कळवा मुंब्राचे अध्यक्ष सैफ पठाण, माजी नगरसेवक शाह आलम, असलम अन्सारी, नासीर शेख, जावेद सिद्दीकी, नफीस अन्सारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.  

यावेळी माजी आमदार वारीस पठाण म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे मुंब्रा अध्यक्ष सैफ पठाण यांच्यातर्फे सामूहिक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. पठाण यांच्या या इफ्तार मुळे समाजातील विविध घटकांना एकत्र येत एकमेकांसोबत इफ्तार करता येतो. सैफ पठाण यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे,  असे ते म्हणाले. 
 मुस्लीम बांधव अन्नपाणी न घेता सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिनाभर उपवास ठेवतात, यामुळे अल्लाहशी नाते जोडण्याची आणि त्याची उपासना करण्याची चांगली संधी मिळते.अशा प्रकारे उपवास करणाऱ्यांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने बंधुभाव आणि प्रेमही वाढते,  असे ते म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब