सोशल मीडियावरील ओळखीतून वडाळ्यातील प्रियकराकडून नेपाळच्या मुलीवर मुंब्र्यात अत्याचार

सोशल मीडियावरील ओळखीतून  वडाळ्यातील प्रियकराकडून नेपाळच्या मुलीवर मुंब्र्यात अत्याचार
मुंब्रा : सोशल मीडियावर नेपाळच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची वडाळ्यातील 22 वर्षीय मुलासोबत मैत्री झाली.  त्यातून त्याने तिला भेटायला बोलावल्यावर ती मुलगी गोरखपूर मार्गे मुंबईत आली. त्या प्रियकराने तिला कल्याण स्थानकात उतरवून घेतले व वडाळ्याऐवजी तो मुंब्रा मध्ये गेला.  तिथे अगोदरच भाड्याने घेतलेल्या रुमवर त्या मुलीला
घेऊन गेला व तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व तिला दिवा स्थानकात लोकलमध्ये बसवून प्रियकर पळून गेला. चित्तथरारक अशी ही कहानी प्रवाशांच्या सतर्कतेमुळे समोर आली. 
लोकलमध्ये विमनस्क अवस्थेत बसलेल्या या मुलीची विचारपूस प्रवाशांनी विचारपूस केल्यावर ही परिस्थिती समोर आली.  त्या मुलीला दादर स्थानकात उतरवून पोलिसांना माहिती देण्यात आली.  पीडित मुलीचा फोन वडाळ्यातील आरोपीने काढून घेतला होता, मात्र तिला त्याचा फोन क्रमांक माहित असल्याने पोलिसांनी तत्काळ तपास करुन अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या.

सोशल मीडियावरील ओळखीतून नेपाळची अल्पवयीन मुलगी भारतात आली मात्र तथाकथित प्रियकराने तिच्यावर अत्याचार केले. दोघांची मैत्री व प्रेम अवघ्या महिन्याभराचेच आहे मात्र त्यासाठी ती मुलगी थेट आपला देश सोडून आली. 

१७ मार्च रोजी मुुलगी बसने गोरखपूरपर्यंत आली. त्यानंतर ट्रेनने ती मुंबईत आली. १९ मार्च रोजी कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये दोघांची भेट झाली. तेथून ते मुंब्र्यात गेले. तेथे आरोपीने एक खोली भाड्याने घेतली होती. तेथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला त्याच दिवशी दिवा स्थानकावर सोडून आरोपी पसार झाला. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत. सध्या हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंब्रा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही