पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संतोष जाधव यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती

इमेज
संतोष जाधव यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती  मुंब्रा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संतोष जाधव यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या  आदेशाने जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उध्दव ठाकरेंचा शिलेदार विजयी करु असा निर्धार संतोष जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.  

एमआयएमची इफ्तार पार्टी संपन्न

एमआयएमची इफ्तार पार्टी संपन्न  मुंब्रा :    एमआयएम पक्षातर्फे मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी देशात शांतता अबाधित राहण्यासाठी व पॅलेस्टाईन पीडितांसाठी प्रार्थना करण्यात आली.  यावेळी पक्षाचे प्रवक्ते माजी आमदार वारीस पठाण,  मुंबई अध्यक्ष फय्याज  खान,  कळवा मुंब्राचे अध्यक्ष सैफ पठाण, माजी नगरसेवक शाह आलम, असलम अन्सारी, नासीर शेख, जावेद सिद्दीकी, नफीस अन्सारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.   यावेळी माजी आमदार वारीस पठाण म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे मुंब्रा अध्यक्ष सैफ पठाण यांच्यातर्फे सामूहिक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. पठाण यांच्या या इफ्तार मुळे समाजातील विविध घटकांना एकत्र येत एकमेकांसोबत इफ्तार करता येतो. सैफ पठाण यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे,  असे ते म्हणाले.   मुस्लीम बांधव अन्नपाणी न घेता सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिनाभर उपवास ठेवतात, यामुळे अल्लाहशी नाते जोडण्याची आणि त्याची उपासना करण्याची चांगली संधी मिळते.अशा प्रकारे उपवास करणाऱ्यांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने बंधुभाव आणि प्रेमही वाढते,  असे

शिवसेनेची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा यादीत समावेश नाही

शिवसेनेची पहिली यादी जाहीर,  मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा यादीत समावेश नाही  मुंबई : शिवसेनेने लोकसभेची पहिली यादी आज जाहीर केली.  विशेष म्हणजे या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे यांच्या नावाला स्थान मिळालेले नाही.  शिवसेनेने या यादीत दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक,शिर्डीत सदाशिव लोखंडे, बुलडाणातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, हातकणंगले मधून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर रामटेकमधून राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे.  पारवे यांनी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र आजच्या यादीच खुद्द श्रीकांत शिंदे व गोडसे दोघांचेही नाव आलेले नाही.  

शिवसेना उबाठाचे लोकसभेचे 17 उमेदवार जाहीर

शिवसेना उबाठाचे लोकसभेचे 17 उमेदवार जाहीर  मुंबई :  लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेन उबाठाने 17 उमेदवार जाहीर केले आहेत.   त्यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे.     दक्षिण मध्य मुंबईतून माजी खासदार अनिल देसाई,  ईशान्य  मुंबईतून माजी खासदार संजय दिना पाटील,    दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.  तर,  बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर, यवतमाळ – वाशिम – संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे पाटील, सांगली -  चंद्रहार पाटील, हिंगोली –  नागेश पाटील आष्टीकर - संभाजीनगर – चंद्रकांत खैरे , धाराशीव –  ओमराजे निंबाळकर, शिर्डी –  भाऊसाहेब वाघचौरे , नाशिक – राजाभाऊ वाजे, रायगड –  अनंत गीते, सिंधुदुर्ग – रत्नागिरी – विनायक राऊत,  ठाणे -राजन विचारे व परभणीतून  संजय जाधव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.  

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

 मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी               मुंबई   : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार ,  अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.             भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  राज्यात या निवडणुकीचे मतदान  १९ एप्रिल ,  दि. २६ एप्रिल ,  दि. ७ मे ,  दि. १३ मे व दि. २० मे ,  २०२४ अशा  पाच टप्प्यात होणार आहे.             भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.             या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार ,  अधिकारी ,  कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही ,  त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर

पार्ट टाईम जाॅब द्वारे पैसे मिळण्याचे अमिष दाखवून महिलेची 9 लाख रुपयांची फसवणूक

पार्ट टाईम जाॅब द्वारे पैसे मिळण्याचे अमिष दाखवून  महिलेची 9 लाख रुपयांची फसवणूक मुंब्रा : 26 वर्षीय महिलेला पार्ट टाईम जाॅब करून पैसे मिळण्याचे अमिष दाखवून तिची 9 लाख 2 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी मुंबेरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत हा गुन्हा घडला. फिर्यादी महिलेला अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हाॅट्स अँप व टेलिग्राम वर मॅसेज करून पार्ट टाईम जाॅब करून पैसे मिळण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर ऑनलाईन टास्क स्किमची लिंक पाठवून वेगवेगळे टास्क पुर्ण करण्यासाठी एकुण 9 लाख 2 हजार 500 रूपये रक्कम विविध युपीआय आयडीवर ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे.  याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा रजि. नं. ।। 1064/2024 भा.द.वि. कलम 419,420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पगार  करीत आहेत.                                              

सोशल मीडियावरील ओळखीतून वडाळ्यातील प्रियकराकडून नेपाळच्या मुलीवर मुंब्र्यात अत्याचार

सोशल मीडियावरील ओळखीतून  वडाळ्यातील प्रियकराकडून नेपाळच्या मुलीवर मुंब्र्यात अत्याचार मुंब्रा : सोशल मीडियावर नेपाळच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची वडाळ्यातील 22 वर्षीय मुलासोबत मैत्री झाली.  त्यातून त्याने तिला भेटायला बोलावल्यावर ती मुलगी गोरखपूर मार्गे मुंबईत आली. त्या प्रियकराने तिला कल्याण स्थानकात उतरवून घेतले व वडाळ्याऐवजी तो मुंब्रा मध्ये गेला.  तिथे अगोदरच भाड्याने घेतलेल्या रुमवर त्या मुलीला घेऊन गेला व तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व तिला दिवा स्थानकात लोकलमध्ये बसवून प्रियकर पळून गेला. चित्तथरारक अशी ही कहानी प्रवाशांच्या सतर्कतेमुळे समोर आली.  लोकलमध्ये विमनस्क अवस्थेत बसलेल्या या मुलीची विचारपूस प्रवाशांनी विचारपूस केल्यावर ही परिस्थिती समोर आली.  त्या मुलीला दादर स्थानकात उतरवून पोलिसांना माहिती देण्यात आली.  पीडित मुलीचा फोन वडाळ्यातील आरोपीने काढून घेतला होता, मात्र तिला त्याचा फोन क्रमांक माहित असल्याने पोलिसांनी तत्काळ तपास करुन अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या. सोशल मीडियावरील ओळखीतून नेपाळची अल्पवयीन मुलगी भारतात आली मात्र तथाकथित प्रियकराने तिच्यावर अत

प्रा. विमल गाडेकर स्मृती दिनी स्वानंद किरकिरे यांच्या सोबत दिलखुलास गप्पांसह विविध कार्यक्रम

इमेज
प्रा. विमल गाडेकर स्मृती दिनी   स्वानंद किरकिरे यांच्या सोबत दिलखुलास गप्पांसह विविध कार्यक्रम मुंबई :  विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनी मंगळवारी 26 मार्च रोजी जे. पी नाईक भवन, मुंबई विद्यापीठ परिसर, कलिना येथे संध्याकाळी चार वाजता सुप्रसिद्ध कवि, गीतकार, लेखक,दिग्दर्शक व अभिनेता  स्वानंद किरकिरे यांच्या सोबत दिलखुलास गप्पांसह विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम ' विमलताई गाडेकर स्मृती सोहळा' समितीने आयोजित केला आहे. ​या कार्यक्रमाला विमलताई गाडेकर यांच्यावर प्रेम करणारे राज्यभरातील त्यांचे चाहते उपस्थित राहणार आहेत. यात साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर, सिनेसृष्टीतील मान्यवर यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक गण आणि निवडक विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे. ​सिने साहित्यिक स्वानंद किरकिरे यांच्यासोबत जेष्ठ संपादक शाम पेठकर संवाद साधणार आहेत. लोकप्रिय अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि कवि, रंगकर्मी व शिक्षण तज्ज्ञ डॉ. मंगेश बनसोड यांचा ‘विमलताईंचा अभिमान- गौरवोल