पार्ट टाईम जाॅब द्वारे पैसे मिळण्याचे अमिष दाखवून महिलेची 9 लाख रुपयांची फसवणूक

पार्ट टाईम जाॅब द्वारे पैसे मिळण्याचे अमिष दाखवून 
महिलेची 9 लाख रुपयांची फसवणूक
मुंब्रा : 26 वर्षीय महिलेला पार्ट टाईम जाॅब करून पैसे मिळण्याचे अमिष दाखवून तिची 9 लाख 2 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी मुंबेरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत हा गुन्हा घडला. फिर्यादी महिलेला अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हाॅट्स अँप व टेलिग्राम वर मॅसेज करून पार्ट टाईम जाॅब करून पैसे मिळण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर ऑनलाईन टास्क स्किमची लिंक पाठवून वेगवेगळे टास्क पुर्ण करण्यासाठी एकुण 9 लाख 2 हजार 500 रूपये रक्कम विविध युपीआय आयडीवर ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे.  याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा रजि. नं. ।। 1064/2024 भा.द.वि. कलम 419,420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पगार  करीत आहेत.                                              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही