शिवसेनेची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा यादीत समावेश नाही

शिवसेनेची पहिली यादी जाहीर,  मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा यादीत समावेश नाही 
मुंबई : शिवसेनेने लोकसभेची पहिली यादी आज जाहीर केली.  विशेष म्हणजे या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे यांच्या नावाला स्थान मिळालेले नाही. 
शिवसेनेने या यादीत दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक,शिर्डीत सदाशिव लोखंडे, बुलडाणातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, हातकणंगले मधून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर रामटेकमधून राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे.  पारवे यांनी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र आजच्या यादीच खुद्द श्रीकांत शिंदे व गोडसे दोघांचेही नाव आलेले नाही.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही