शिवसेना रिक्षा युनियनतर्फे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धरणे आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

शिवसेना रिक्षा युनियनतर्फे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धरणे आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न 
मुंब्रा : मुंब्रा कौसा मध्ये मुख्य चौकात सिग्नल सुरु करावेत, अमृत नगर ते तन्वर नगर पर्यंत रिक्षांसाठी स्टँड तयार करावेत यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना रिक्षा युनियनतर्फे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ हे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.  

 महापालिकेचे कंत्राटदार कुठेही कधीही खोदकाम करतात, फेरीवाले रस्त्यावर दुकाने लावतात,  त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते व रिक्षाचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार रोखण्याची मागणी सातत्याने करण्यात आली मात्र प्रभाग समितीने त्याकडे नेहमी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. दोन दिवस हे धरणे आंदोलन सुरु राहील व प्रशासनाने उदासीन भूमिका घेतल्यास त्यानंतर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा 
शिवसेना रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष अनिस अन्सारी यांनी दिला आहे. मुंब्रा एम गेट जवळ हे धरणे आंदोलन करण्यात आले. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब