पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शानू पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

इमेज
नफिसा गिरकर : ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अश्रफ शानू पठाण यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका निवडणुकीत विजयी होऊन नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन अपमान केल्याचा आरोप भाजपाच्या कौसा मंडळ अध्यक्ष नाझिया तांबोळी यांनी केला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शानू पठाण यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 299 व 302 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अमृत नगर येथील दर्गाह गल्लीमध्ये स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या विजयी मेळाव्यात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा प्रकार घडला होता. याबाबतची चित्रफित मुंब्रा व इतर परिसरात प्रसारित झाली असून मुंब्रा येथील मराठी मुसलमान म्हणून आपली शानू पठाण यांच्या विरोधात तक्रार असल्याचे तांबोळी म्हणाल्या. सदर चित्रफितीतील भाषणावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा दिसत आहेत, शानू पठाण...

मुंब्रामध्ये शिया समाजाचा इस्राईल व अमेरिका विरोधात भव्य मोर्चा

इमेज
नफिसा गिरकर : इस्राईल व अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याविरोधात मुंब्रा मधील  अमृत नगर जवळील शिया समुदायाच्या मशीदीजवळ  या समाजाने भव्य मोर्चा काढला व अमेरिकेचा निषेध केला.  इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांच्या निधनाबद्दल यावेळी शोक व्यक्त करण्यात आला. अमेरिका व इस्राईलच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शिया समुदायामुळे मुंब्रा येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.  अमेरिकेच्या दमणकारी योजना विरोधात या समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. इराणवरील हल्ला हा केवळ इराण देशावरील हल्ला नसून जगातील संपूर्ण शिया समुदायावरील हल्ला असल्याचे आम्ही मानतो असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. इस्राईल व अमेरिकेच्या विविध वस्तूंवर बहिष्कार घालण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शानू पठाण यांचा सत्कार

इमेज
नफीसा  गिरकर- ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी दुसऱ्यांदा निवड झाल्या बद्दल मुंब्रा कौसा येथील प्रभाग क्रमांक 32 चे नगरसेवक अश्रफ शानू पठाण यांचा मुंब्रा कौसामध्ये विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली या सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. मुंब्रा रेल्वे स्थानकापासून शिमला पार्क परिसरापर्यंत विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत पुष्पहार घालून पठाण यांचा सत्कार करण्यात आला.  सत्काराला उत्तर देताना पठाण यांनी मुंब्रा कौसा येथील नागरिकांच्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले व प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पूर्ण क्षमतेने तत्पर राहण्याची ग्वाही दिली. आमदार जितेंद्र आव्हाड व पक्षाने जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे त्याला पात्र ठरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याची ग्वाही शानू पठाण यांनी दिली. मुंब्रा मध्ये काही ठिकाणी उद्भवलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.  यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक...

कझाकस्तानचे राष्ट्रपती टोकायेव यांचा गल्फ देशांना पाठिंबा- लष्करी कारवायांचा निषेध

इमेज
नफिसा गिरकर  : कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट टोकायेव यांनी गल्फमधील पाच देशांच्या नेत्यांना वैयक्तिक संदेश पाठवत सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत त्या देशांच्या जनतेशी ऐक्य आणि ठाम पाठिंबा व्यक्त केला आहे. ही माहिती नवी दिल्ली येथील कझाकस्तानचे राजदूत अझमत येस्कारायेव यांनी दिली. राजदूत येस्करायेव यांनी सांगितले की, राष्ट्रपती टोकायेव यांनी युएई, सौदी अरेबिया, कतार, बहरिन, कुवैत या देशांच्या नेतृत्वाला वैयक्तिक संदेश पाठवले. या संदेशांमध्ये त्यांनी संबंधित देशांच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि स्थैर्याला कझाकस्तानचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नमूद केले. मैत्रीपूर्ण आणि बंधुत्वाच्या देशांच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही लष्करी कारवायांचा कझाकस्तानने तीव्र निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि सशस्त्र संघर्ष हे केवळ राजनैतिक मार्गाने आणि संवादातूनच सोडवले जावेत, ही कझाकस्तानची स्पष्ट भूमिका असल्याचे राष्ट्रपती टोकायेव यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केले. “आमचा देश सर्व गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि सशस्त्र संघर्ष केवळ राजनैतिक मार्गाने सोडवण्याचा...

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

इमेज
नफिसा गिरकर : नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी  कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय, खाजगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार समितीचे परीक्षण (पॉश ऑडिट) एक महिन्यात करण्यात यावे असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.   कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ (PoSH Act) नुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ, मंडळ, स्वायत संस्था व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती (IC) स्थापन करून प्रभावीपणे कार्यरत असणे बंधनकारक आहे, तसेच जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती (LC) असणे बंधनकारक आहे.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर  यांच्याकडे येणाऱ्या विविध तक्रारी, अहवाल तसेच राज्यभरात दौरा करताना याबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.  अनेक कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीची स्थापना नाही, केवळ कागदावर असलेल्या समिती, त्याबाबत ...

ऑनलाईन खाद्य वितरण कर्मचाऱ्यांची आस्थापनांनी चारित्र्य पडताळणी करा- कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश

इमेज
नफिसा गिरकर : ऑनलाईन खाद्य वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्व आस्थापनांनी चारित्र्य पडताळणी अनिवार्यपणे करणे आवश्यक आहे. आधार कार्ड ,  पॅन कार्ड ,  ड्रायव्हिंग लायसन्स ,  वाहन विमा व श्रम नोंदणी यांसह सर्व कागदपत्रांची तपासणी केली जावी. पोलीस पडताळणी न करता कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. असे  कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.   मुंबईसह राज्यात ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांकडून वितरण कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्याबाबत विधानसभेत सदस्य भिमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला..  फुंडकर म्हणाले की ,   सध्या काही  कंपन्या ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशनद्वारे डिलिव्हरी पार्टनरची नियुक्ती करतात. ही प्रक्रिया त्रयस्त संस्थांमार्फत होत असल्याने कंपन्यांची थेट जबाबदारी मर्यादित दिसते. मात्र अलीकडच्या काळात काही ठिकाणी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहविभाग आणि कामगार विभाग यांनी याबाबत चर्चा केली आहे ,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.