पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

मुंबई : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात - 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी - 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक - 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर - 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिवंडी - 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्याण - 34 उमेदवारांचे 45 अर्ज,  ठाणे - 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर - 25 उमेदवारांचे 32 अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम - 29 उमेदवारांचे 33 अर्ज,  मुंबई उत्तर - पूर्व - 34 उमेदवारांचे 42 अर्ज,  मुंबई उत्तर – मध्य - 39 उमेदवारांचे 45 अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य - 32 उमेदवारांचे 41 अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात  21 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही