अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचे मानधन नाही, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचे मानधन  नाही, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ
मुंबई  :   महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 
         महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधना अभावी उपासमार होत आहे. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र, अध्यक्षा ॲड. निशा  शिवूरकर यांनी  निवडणूक प्रचारात मग्न असलेल्या मुख्यमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्र्याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन त्वरीत जमा करण्याची मागणी केली  आहे. 
       सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी मात्र टाळत आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्कील झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे,  असे सरचिटणीस कमल परुळेकर यांनी सांगितले. 
       एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव घोषणा द्यायची मात्र महिला व बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याना वेळेवर मानधन द्यायचे नाही, या विसंगती कडे ॲड. निशा शिवूरकर यांनी लक्ष वेधले आहे. प्रचंड उन्हाळा, पाणी टंचाई आणि उपासमारीच्या चक्रात अडकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाच्या  उदासीनतेचा अंगणवाडी कर्मचारी सभेने निषेध केला आहे. तसेच मानधन त्वरित जमा करावे अशी मागणी सरचिटणीस कमल परुळेकर, कार्याध्यक्ष कृष्णा भानारकर, उपाध्यक्ष नितीन पवार यांनी केली आहे.
                      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही