भाजपतर्फे नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, शुक्रवारी अर्ज दाखल करणार

भाजपतर्फे नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, शुक्रवारी अर्ज दाखल करणार

मुंबई - रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेतला आहे.  तत्पूर्वी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यातर्फे माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने राणे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले. 

२०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले होते. १९९६  पासून या मतदारसंघातून २००९ चा अपवाद वगळता शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आता महायुतीमध्ये भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. २००९ मध्ये निलेश राणे हे कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते. 

या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हे विधानसभा मतदारसंघ तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. कणकवली मध्ये भाजपचे निलेश राणे, कुडाळमध्ये शिवसेना उबाठाचे वैभव नाईक, सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दिपक केसरकर, चिपळूण मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर निकम, राजापूर मध्ये शिवसेना उबाठाचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही