स्वतःच्या मुलीचा खुन करून मृतदेह पुरणा-या आई-वडीलांना मुंब्रा पोलीसांनी केली अटक

स्वतःच्या मुलीचा खुन करून मृतदेह पुरणा-या आई-वडीलांना मुंब्रा पोलीसांनी केली अटक
मुंब्रा : 
दीड वर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आई वडिलांना अटक केली आहे. या
दीड वर्षीय मयत मुलीला 19 मार्च रोजी  मध्यरात्री अडीच वाजता दफन करण्यात आले होते. पोलिसांनी मेडफॉर्ड हॉस्पिटल व अलमास हॉस्पिटल यांच्याकडे  चौकशी करून मुलीवर करण्यात आलेल्या उपचाराची माहिती मिळाली. या दोन रुग्णालयातील मुलींच्या उपचाराचा बाबत विसंगती आढळुन आली. मुलीचे आई - वडील  जाहीद  शेख व बुरानी  शेख यांच्याकडे चौकशी केल्यावर ते  मुलीच्या मृत्युचे कारण लपवीत असल्याचे त्यांच्या जबाबावरून स्पष्ट झाले होते.

पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या,  याबाबत कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तन कोळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. 


मुलीच्या मृत्यु नंतर सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती न देता तसेच रूग्णालयात मयत मुलीच्या दुखापतीबाबत चुकीची माहिती देवून रुग्णालयाकडून मृत्यु दाखला (डि.सी.) प्राप्त करून घेतला. 

 मयत मुलीला रितीरिवाजाप्रमाणे  कौसा कब्रस्तान येथे पुरले (दफन) केले म्हणुन, मुंब्रा पोलीस ठाण्यात गु. रजि. नंबर ११५३/२०२४ भादवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  

सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने मुलीचे  दफन केलेले शव न्यायालयाचे आदेशाने, नायब तहसिलदार, वैदयकिय अधिकारी, पंच याचे समक्ष बाहेर काढून शवावर शवविच्छेदन छ.शि.म. हॉस्पिटल येथे करून, वैदयकिय अधिकारी यानी दिलेल्या अभिप्रायावरून  सदर मुलीचा मृत्यु हा तिच्या डोक्यावर केलेल्या जखमांमुळे झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. 



नमुद गुन्हयाच्या तपासात पोलीस आयुक्त  आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त  ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त  सुभाष बुरसे, कळवा विभागाचे सहा. पोलीस आयुक्त  उत्तम कोळेकर, मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय दवणे, सह तपासी अधिकारी सपोनि कोरडे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तपास केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही