मुंब्रा कौसा मध्ये शब ए बारात निमित्त मुस्लिम बांधवांनी केली प्रार्थना, पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंब्रा कौसा मध्ये शब ए बारात निमित्त मुस्लिम बांधवांनी केली प्रार्थना, पोलिसांचा चोख बंदोबस्त
मुंब्रा : बडी रात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शब ए बारात च्या रात्री प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने मुंब्रा कौसा मधील  मुस्लिम बांधव विविध मशीदींमध्ये जमले होते. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. ठाण्याचे पोलिस सह आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील यांनी मुंब्रा कौसा येथे भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली व पोलिसांना मार्गदर्शन केले.
कौसा कब्रस्तान, नवीन कब्रस्तान, विविध मशीदींजवळ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त एस. एस. बुरसे, कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तम कोळेकर हे स्वतः बंदोबस्तामध्ये सहभागी होते. मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी त्यांच्या पथकासहित पूर्ण मुंब्रा कौसा परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.  
शब ए बारातच्या रात्री मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये जावून मृत व्यक्तींच्या कबरीला भेट देतात व त्यांच्यासाठी प्रार्थना करतात, तसेच पूर्ण रात्र नमाज पठण, कुराण पठण करतात. मुंब्रावासीयांनी मोठ्या संख्येने दर्गाह रोड कबस्तान,कौसा कब्रस्तान, नवीन कब्रस्तान या ठिकाणी भेट दिली व मृत व्यक्तींसाठी प्रार्थना केली.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही