पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचे मानधन नाही, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचे मानधन  नाही, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ मुंबई  :   महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.           महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधना अभावी उपासमार होत आहे. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र, अध्यक्षा ॲड. निशा  शिवूरकर यांनी  निवडणूक प्रचारात मग्न असलेल्या मुख्यमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्र्याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन त्वरीत जमा करण्याची मागणी केली  आहे.         सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी मात्र टाळत आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्कील झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे,  असे सरचिटणीस कमल परुळेकर यांनी सांगितले.         एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव घोषणा द्यायची मात्र महिला व बाल क

भाजपतर्फे नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, शुक्रवारी अर्ज दाखल करणार

भाजपतर्फे नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, शुक्रवारी अर्ज दाखल करणार मुंबई - रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेतला आहे.  तत्पूर्वी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यातर्फे माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने राणे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले.  २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले होते. १९९६  पासून या मतदारसंघातून २००९ चा अपवाद वगळता शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आता महायुतीमध्ये भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. २००९ मध्ये निलेश राणे हे कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते.  या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हे विधानसभा मतदारसंघ तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. कणकवली म

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

  वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार मुंबई :  महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांक गाठलेला असून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून पहिल्यांदाच रूपये ३ लक्ष कोटींचा टप्पा पार केलेला आहे. या वर्षी राज्याचे वस्तू व सेवा कर संकलन, रूपये ३.२ लक्ष कोटी एवढे झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदवलेली असल्याची माहिती मुंबईचे राज्यकर उपआयुक्त यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील वस्तू व सेवा कर संकलनाचा देशातील (रूपये २०.२ लक्ष कोटी) सकल वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के नोंदविला असून गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्का वाढ दिसून येत आहे. तसेच वस्तू व सेवा कर संकलनातील राज्याचा वाढीचा दर (१८ टक्के) हा देशाच्या सरासरी दरापेक्षा (१२ टक्के) अधिक आहे. राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करता, राज्यास वस्तू व सेवा करातून रूपये १,४१,७०० कोटी एवढ़ा उच्चांकी महसूल मिळालेला असून त्यामध्ये राज्य व सेवा कर (SGST) रूपये ९३,४०० कोटी तर एकात्मिक करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी  81 वा क्रमांक पटकावला आहे. एक नजर निकालावर समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (190) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनी राज्यात १ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान एकूण ४२१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, फ्रिबीज, मौल्यवान धातूंचा इतर बाबींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई करण्यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्य व जिल्हा पातळीवर भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), नेमण्यात आली आहेत. या पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे. १ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत राज्यातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ३९.१० कोटी रुपयांची रोख रक्कम, २७.१८ कोटी रुपये किंमतीची ३३ लाख ५६ हजार ३२३ लिटर दारु, २१२.८२ कोटी रुपये किंमतीचे ११ लाख ४२ हजार ४९८ ग्रॅ

स्वतःच्या मुलीचा खुन करून मृतदेह पुरणा-या आई-वडीलांना मुंब्रा पोलीसांनी केली अटक

इमेज
स्वतःच्या मुलीचा खुन करून मृतदेह पुरणा-या आई-वडीलांना मुंब्रा पोलीसांनी केली अटक मुंब्रा :  दीड वर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आई वडिलांना अटक केली आहे. या दीड वर्षीय मयत मुलीला 19 मार्च रोजी  मध्यरात्री अडीच वाजता दफन करण्यात आले होते. पोलिसांनी मेडफॉर्ड हॉस्पिटल व अलमास हॉस्पिटल यांच्याकडे  चौकशी करून मुलीवर करण्यात आलेल्या उपचाराची माहिती मिळाली. या दोन रुग्णालयातील मुलींच्या उपचाराचा बाबत विसंगती आढळुन आली. मुलीचे आई - वडील  जाहीद  शेख व बुरानी  शेख यांच्याकडे चौकशी केल्यावर ते  मुलीच्या मृत्युचे कारण लपवीत असल्याचे त्यांच्या जबाबावरून स्पष्ट झाले होते. पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या,  याबाबत कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तन कोळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.  मुलीच्या मृत्यु नंतर सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती न देता तसेच रूग्णालयात मयत मुलीच्या दुखापतीबाबत चुकीची माहिती देवून रुग्णालयाकडून मृत्यु दाखला (डि.सी.) प्राप्त करून घेतला.   मयत मुलीला रितीरिवाजाप्रमाणे  कौसा कब्रस्तान येथे पुरले (दफन) केले म्हणुन, मुं