पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

  आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश मुंबई : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. आरोग्य विभागाने युद्धपातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्या माध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एम

कपिल पाटील यांच्या हस्ते ई- कार्ट लोकार्पण सोहळा संपन्न, ई- कार्ट योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल- कपिल पाटील

कपिल पाटील यांच्या हस्ते ई- कार्ट लोकार्पण सोहळा संपन्न, ई- कार्ट योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल- कपिल पाटील ठाणे - केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री  कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचतगटांना ई- कार्ट लोकार्पण सोहळा  दिवे-अंजूर, येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत बचतगट यांना ई-कार्ट पुरविणे ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.        जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषी विभागातील ई-कार्ट योजनेचे काम संपुर्ण देशभर आदर्श ठरेल अशा पध्दतीने काम करण्याच्या सूचना पाटील यांनी शेतकरी गटाच्या सदस्यांना केल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. या योजनेतंर्गत शेतकरी बचतगटांनी स्वत: पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे. तसेच बचतगटांना स्वत:चे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होऊन स्वत:चा जास्तीत जास्त वेळ शेतीच्या व इतर कामासाठी देता येईल, वाहनामुळे दिवसभर भाजीपाला स्वच्छ व ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत – मंत्री संजय बनसोडे

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत – मंत्री संजय बनसोडे मुंबई : कोकणचा सर्वांगिण विकास होण्यासाठी कोकणातील बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायाभूत सोयी – सुविधांची विकास कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. कोकणातील विविध बंदर विकासाबाबत आढावा बैठक मंत्री  बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, बंदरे विभागाचे प्रधान सचिव संजय सेठी, सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य अभियंता  गोसावी आदींसह अधिकारी उपस्थित होते. वाल्मिकी नगर जेट्टीचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देत मंत्री  बनसोडे म्हणाले, येथील रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. जंजिरा येथे दोन रस्ते करून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात. आणखी एक रस्ता झाल्यास या भागाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल. पर्यावरणाला कुठलीही हानी पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी पर्यावरण विभागाची मान्यता घेवून कामे करावीत. बंदरांमधील विकास कामांचे नकाशे तातडीने संबंधि

शिवसेना रिक्षा युनियनतर्फे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धरणे आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

शिवसेना रिक्षा युनियनतर्फे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धरणे आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न  मुंब्रा : मुंब्रा कौसा मध्ये मुख्य चौकात सिग्नल सुरु करावेत, अमृत नगर ते तन्वर नगर पर्यंत रिक्षांसाठी स्टँड तयार करावेत यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना रिक्षा युनियनतर्फे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ हे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.    महापालिकेचे कंत्राटदार कुठेही कधीही खोदकाम करतात, फेरीवाले रस्त्यावर दुकाने लावतात,  त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते व रिक्षाचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार रोखण्याची मागणी सातत्याने करण्यात आली मात्र प्रभाग समितीने त्याकडे नेहमी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. दोन दिवस हे धरणे आंदोलन सुरु राहील व प्रशासनाने उदासीन भूमिका घेतल्यास त्यानंतर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा  शिवसेना रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष अनिस अन्सारी यांनी दिला आहे. मुंब्रा एम गेट जवळ हे धरणे आंदोलन करण्यात आले. 

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर मुंबई :   राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९  हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९  हजार १९३ कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी २  हजार २०५ कोटी रुपये, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजने

मुंब्रा कौसा मध्ये शब ए बारात निमित्त मुस्लिम बांधवांनी केली प्रार्थना, पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंब्रा कौसा मध्ये शब ए बारात निमित्त मुस्लिम बांधवांनी केली प्रार्थना, पोलिसांचा चोख बंदोबस्त मुंब्रा : बडी रात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शब ए बारात च्या रात्री प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने मुंब्रा कौसा मधील  मुस्लिम बांधव विविध मशीदींमध्ये जमले होते. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. ठाण्याचे पोलिस सह आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील यांनी मुंब्रा कौसा येथे भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली व पोलिसांना मार्गदर्शन केले. कौसा कब्रस्तान, नवीन कब्रस्तान, विविध मशीदींजवळ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त एस. एस. बुरसे, कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तम कोळेकर हे स्वतः बंदोबस्तामध्ये सहभागी होते. मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी त्यांच्या पथकासहित पूर्ण मुंब्रा कौसा परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.   शब ए बारातच्या रात्री मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये जावून मृत व्यक्तींच्या कबरीला भेट देतात व त्यांच्यासाठी प्रार्थना करतात, तसेच पूर्ण रात्र नमाज पठण, कुराण पठण करतात. मुंब्रावा

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा – डॉ. नीलम गोऱ्हे

इमेज
औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई :  राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटना विषयी उपाय योजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस देविदास गोरे, संचालक, औद्यागिक सुरक्षा विभाग, मुंबई, डॉ अविनाश ढाकणे सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, पुणे शहर, प्रदीप जांभडे पाटील, अति आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा, संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड, रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प पुणे ,कैलास केंद्रे मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद, संतोष वारीस, संचालक फायर ब्रिगेड सेवा महाराष्ट्र, कळसकर उपायुक्त परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शैले