पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे पोलिसांना मार्गदर्शक : नरेंद्र वाबळे, नवोन्मेष व्याख्यानमाला - २०२४ मध्ये प्रतिपादन

इमेज
पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे पोलिसांना मार्गदर्शक : नरेंद्र वाबळे,   नवोन्मेष व्याख्यानमाला - २०२४ मध्ये प्रतिपादन मुंबई : वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व घडते. संस्कारक्षम वयातील वाचन माणसाचे चरित्र घडवीते. म्हणून प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. विशेषत: पोलिसांनी निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे अवश्य वाचावीत. त्याचा त्यांना लाभच होईल, असे उद्गार मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी काढले. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या नवोन्मेष व्याख्यानमाला - २०२४ चे पहिले पुष्प गुंफताना उद्घाटक व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई डॉ. रवींद्र शिसवे होते. प्रारंभी डॉ. शिसवे यांनी पुष्पगुच्छ देऊन  वाबळे यांचा सत्कार केला. ‘वाचन : एक सुखद प्रवास’ या विषयावर बोलताना  वाबळे म्हणाले की, जन्माला आल्यावर माणसाचा जीवनप्रवास सुरू होतो. तो शाळेत जाऊ लागल्यावर लिहू-वाचू लागतो. त्यानंतर त्याचा वाचनप्रवास सुरू होतो. लहानपणी वाचलेली चांगली पुस्तके माणसाचे चरित्र घडवितात. आम्हाला आमच्या आईने वाचनाची गोडी लावली. आम्हा भावंडांना आई रो